Events

रियालिटीचा खेळ

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवणाऱ्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित 39 वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. 11 व 12 डिसेंबर 2025 रोजी, यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे रंगणाऱ्या या महोत्सवात एकापेक्षा एक कल्पनाशक्तीने ओतप्रोत 19 बालनाट्यांची रंगतदार चुरस पहायला मिळाली.

 

या स्पर्धेमध्ये डॉ. कालमाडी शामराव हायस्कुल, गणेशनगर,पुणे प्रस्तुत नाटिका ” रिॲलिटीचा खेळ” मधील ‘अवनी भट’ आणि ‘निनाद वाणी’ यांना ‘अभिनय शिफारस पत्र’ यांनी सन्मानित करण्यात आले.यावर्षीची ही स्पर्धा रविकिरण मंडळाचे ज्येष्ठ, निष्ठावान सभासद मनोहर नगरकर आणि कोकणच्या लालमातीतील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आली आहे. रविकिरण संस्थेचे अध्यक्ष नागेश नामदेव वांद्रे, चिटणीस विनीत रमेश देसाई यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली.

Archives

Categories