Teacher's Professional Development

ग्रामसेतू उपक्रमाला नवी दिशा

दिनांक 20 /6/ 2026 रोजी ग्रामपरी पाचगणी येथे ग्रामसेतू उपक्रमा संदर्भात शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूल, गणेश नगर शाळेच्या प्रिया अत्रे आणि रागिणी जोशी या सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. त्यामुळे सहभागी सर्व शिक्षकांना औषधी रोपे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रिया अत्रे आणि रागिणी जोशी या सलग पाच वर्ष या उपक्रमात सातत्याने सहभागी असल्यामुळे त्यांनी या उपक्रमाविषयीचे त्यांचे अनुभवही सर्व शिक्षकांना सांगितले. ग्रामीण भागातील चार आणि शहरी भागातील चार अशा एकूण आठ शाळांमधील शिक्षक या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते.

ग्रामसेतू उपक्रम हा पुढे कसा न्यायचा, विद्यार्थ्यांमध्ये मैत्री संबंध दृढ व्हावे या दृष्टीने कोणकोणती सत्रे या उपक्रमा अंतर्गत घेण्यात यावी याविषयी शिक्षकांमध्ये चर्चा झाली. त्यानुसार नवीन वर्षी चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये चार ऑनलाईन व दोन ऑफलाइन सत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत.

या उपक्रमात डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूल, गणेश नगर शाळेचे इयत्ता आठवी, नववी व दहावी तसेच शाळेतून दहावी उत्तीर्ण झालेले असे एकूण 40 विद्यार्थी सहभागी होणार आहेत

Archives

Categories