Events

Gramsetu visit 2026

ग्रामसेतू म्हणजेच rural urban connect या पाच वर्षांपासून चालू उपक्रमाअंतर्गत डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल,गणेशनगर येथील विद्यार्थ्यांनी ३० जानेवारी २०२६ रोजी जनता माध्यमिक विद्यालय ,करंदी, तालुका जावळी,जिल्हा सातारा येथे प्रत्यक्ष भेट दिली.

 

ढोल आणि टाळ्यांच्या गजरात डॉ.कलमाडी शामराव हायस्कूल,गणेशनगर येथील विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. प्रार्थना, ईशस्तवन ,सत्कार यानंतर ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी विविध अँक्टिव्हिटी ग्रामपरीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केल्या होत्या. डॉ .कलमाडी शामराव हायस्कूल,गणेशनगर येथील विद्यार्थ्यांनी रियालिटीचा खेळ या नाटकातील छोटा प्रसंग सादर करून सर्वांची मने जिंकली. दोन्ही कडील विद्यार्थ्यांनी ग्रामसेतू उपक्रमाविषयी आपले अनुभव सांगितले.

 

या नंतर गावातील शाळा पाहणे,गाव पाहणे,गावातील मंदिरे,व्यायामशाळा पाहणे,गावातील आपल्या मित्रमैत्रिणींच्या घरी चुलीवर बनवलेल्या गरम जेवणाचा आस्वाद घेणे, स्ट्रॉबेरी चे शेत पाहणे,शेतातील जोड पिकांची माहिती घेणे,गोठा पाहणे,गोबरगॅस प्रकल्पाची माहिती घेणे,शेतातील मेथी, कोथिंबीर तोडून त्याच्या गड्डया बांधणे ,शाळेच्या मोठ्या मैदानावर ग्रामीण भागातील मित्रमैत्रींणीबरोबर खोखो सारखे खेळ खेळणे या सर्व गोष्टींचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.

 

ग्रामीण भागातील आपल्या मित्रमैत्रिणींच्या शेतात पिकलेली स्ट्रॉबेरी आणि तांदूळ भेट म्हणून घेऊन विद्यार्थी गावाकडच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेल्या दिवसभराच्या गोड आठवणी आणि नवीन अनुभव घेऊन संध्याकाळी साडेसात वाजता पुणे येथे परत आले.

Archives

Categories