Events

Gramsetu 2025

डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगर, पुणे आणि ग्रामपरी पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रामसेतू’ या कार्यक्रमांतर्गत जनता माध्यमिक विद्यालय, तालुका जावळी ,जिल्हा सातारा या शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगर येथे प्रत्यक्ष भेट दिली .ढोलताशाच्या गजरात विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.या प्रत्यक्ष भेटी अंतर्गत विविध सत्र ,जनता माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती .त्यामध्ये क्राफ्टअँक्टिव्हिटी, कम्प्युटरचे स्क्रॅच सेशन,जीवित नदी अशी विविध सत्रे आयोजित केली होती, तसेच डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगर येथील इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या नाट्यगृहामध्ये जनता माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी एक नाटकही सादर केले. हा सर्व अनुभव ग्रामीण विद्यार्थी व शिक्षकांसाठी नवीन होता. नाट्यगृहात बसून नाटक पाहणे हा अनुभव विद्यार्थ्यांनी प्रथमच घेतला. ही सर्व सत्रे करत असताना डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल,  गणेशनगर येथील विद्यार्थ्यांनी जनता माध्यमिक विद्यालय मधील विद्यार्थ्यांना मदत केली.

सर्व कार्यक्रमासाठी कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक सल्लागार मा. पल्लवी नाईक मॅडम, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगरच्या मुख्याध्यापिका मा. अंजली कुलकर्णी ,पर्यवेक्षिका मिथिला जोशी मॅडम,पल्लवी अय्यर मॅडम,सांस्कृतिक विभाग  प्रमुख कांचन भट मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

Archives

Categories