सकाळ पुणे व मातृ मंदिर विश्वस्त संस्था, निगडी यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हास्तरीय अंतरशालेय नाट्यस्पर्धा उत्साहात पार पडली. ही स्पर्धा निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या वाधोकर सभागृहात पार पडली. या स्पर्धेत एकूण ३२ नाटिका सादर करण्यात आल्या. विभागनिहाय, डॉ. कलामडी शामराव हायस्कूलने “गेम ओव्हर” ही नाटिका सादर करून सामाजिक गटात द्वितीय क्रमांक, तसेच नेपथ्यात प्रथम क्रमांक पटकावला.