डॉ.कलमाडी शामराव हायस्कूल ,गणेशनगर,पुणे ,यांनी 14 ते 26 ऑगस्ट दरम्यान बालसंगीत एवं नृत्यमहोत्सवाचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांमधील सुप्त सांगीतिक गुणांचा विकास व्हावा आणि एक उत्तम व्यासपीठ त्यांना कलेच्या सादरीकरणासाठी उपलब्ध व्हावे म्हणून या महोत्सवाची सुरुवात झाली.संस्थेचे महोत्सवाचे हे 28 वे वर्ष होते.
या महोत्सवादरम्यान शास्त्रीय गायन,वादन, शास्त्रीय नृत्य,नाट्यसंगीत,भक्तीगीत अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते,संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत संगीतज्ञ या स्पर्धांचे परीक्षण करतात.या वर्षी तब्बल 280 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन हा उत्सव खऱ्या अर्थाने महोत्सव केला.
29 ऑगस्ट रोजी बालसंगीत एवं नृत्य महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.प्रशालेच्या माजी संगीत शिक्षिका माननीय रजनी पाच्छापूर मॅडम यांच्या स्मरणार्थ विशेष पुरस्कारही देण्यात आले.कार्यक्रमासाठी माननीय मालती कलमाडी ,सेक्रेटरी कन्नड संघ,तसेच जीवित नदी संस्थेच्या संस्थापक संचालक,माननीय शैलजा देशपांडे उपस्थित होत्या.याच दिवशी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी गायलेले, व प्रशालेच्या शिक्षकांनी लिहिलेले व संगीतबद्ध केलेले ‘Kaveri- the river song’सादर करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी नेहेमी गुरुचे स्मरण ठेवावे,गुरूंच्या मार्गदर्शनानुसार चालावे,स्पर्धांमध्ये भाग घ्यावा,12 वर्ष तरी कलेची साधना करावी,अपयशाने खचू नये या शब्दात कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विदुषी आरती अंकलीकर –टिकेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.