School Event

GuruPurnima Celebration

डॉ.कलमाडी शामराव हायस्कूल, प्राथमिक विभाग, डॉ.केतकर रोड, इथे 13 जुलै 2022 रोजी गुरुपौर्णिमा जोरात साजरी झाली.

 

या निमित्ताने मुलांना सौ असिता आपटे व सौ अर्चना काजळे टीचर यांनी पीपीटी द्वारे गुरु-शिष्यांच्या जोड्या दाखविल्या व त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. यानंतर डॉक्टर सौ राजश्री महाजनी व सौ माधुरी पुराणिक यांनी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून सत्यम शिवम सुंदरा हे गाणे म्हणून घेतले.

 

संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन शौर्या कुलकर्णी व संस्कृती नाडगौडा या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर रित्या सादर केले. मुख्याध्यापिका सौ ज्योती कडकोळ यांनी मुलांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वर्ग, पर्यवेक्षिका व सेवक वर्ग हजर होता.

Archives

Categories

Back to Top