School Event

Yoga Day, Music Day

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग आणि जागतिक संगीत दिवस असतो. दरवर्षी हा दिवस आपण डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल ,डॉ. केतकर रोड ,एरंडवणे पुणे -४ येथे साजरा करतो.

 

भारतीय ‘संगीत ‘आणि ‘योग’ ह्या दोन्हींना हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन काळी ऋषीमुनी तप आणि योगाभ्यास करत असत व निरोगी राहून दीर्घायुष्य मिळवत असत. भारतीय संगीताची सुरुवात सामगायनापासून होते. यामध्ये ऋचा गायन,ओंकार साधना त्याबरोबर योगसाधना याचा समावेश होता.आजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला शांतता आणि उत्तम आरोग्य या दोन्हींची नितांत आवश्यकता आहे आणि ते केवळ योग आणि संगीताद्वारेच मिळू शकते. म्हणूनच आपण आंतरराष्ट्रीय योग व संगीत हा दिवस एकत्रितपणे साजरा करतो. या दोन्ही दिवसाचे ह्या दोन्ही दिवसाचे औचित्य साधून मुलांनी लयबध्द स्वर म्हटले. (सा,रे,ग,म) त्याच बरोबर इतर सर्व मुलांनी आसने केली.

 

तंबोऱ्याच्या साथीने ओंकार व प्राणायामाचे प्रकार(ओंकार,गुंजन,भ्रामरी)सादर केले. त्यानंतर मुलांनी एक योग गीत म्हटले त्याचा आनंद मुलांनी लुटला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संगीत संगीताचे मार्गदर्शन संगीत शिक्षिका डॉ .राजश्री महाजनी , सौ. माधुरी पुराणिक यांनी केले. पी. टी. टीचर श्री अनिल जाधव व सौ. स्वाती सातपुते यांनी योगाबद्दलचे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सौ. ज्योती कडकोळ यांनी मुलांना योगासनाचे व संगीताचे जीवनातील महत्त्व हे मुलांना समजावून सांगितले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षिका,विद्यार्थी,पर्यवेक्षिका, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Archives

Categories