दिनांक १६ सप्टेम्बर २०२३ रोजी जनता माध्यमिक विद्यालय, तालुका जावळी, जिल्हा सातारा यांनी डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगर येथे ग्रामसेतू उपक्रमा अंतर्गत प्रत्यक्ष भेट दिली.
प्रथम सत्रात स्वागत, दीप प्रज्ज्वलन, सरस्वती वंदना या नंतर कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही कडील विद्यार्थ्यांनी मिळून गणेशोत्सवासाठी उपयुक्त मखरे व तोरणे तयार केली. त्या नंतर सायबर सुरक्षा या सत्रात संगणक शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली online जगात तसेच device वापरताना कशी सुरक्षितता बाळगावी या विषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. त्या नंतर drum circle या सत्रात झेंबे हे वाद्य वाजवण्याचा आनंद आणि अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. एरवी चालत शाळेत जाणाऱ्या जावळी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मेट्रो सफर आनंदायी ठरली.