इयत्ता आठवी व नववी चा वार्षिक निकाल तसेच मतदान जनजागृती दिनांक 29- 4 -2024 रोजी शाळेच्या वार्षिक निकाल घोषित करण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांना माननीय मुख्याध्यापक श्री चंद्रकांत हारकुडे यांनी निकालाची माहिती दिली तसेच मतदार जनजागृती देखील केली मतदारांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले व मतदानाच्या दिवशी आपले अमूल्य मत देण्याविषयी जागृत केले.
श्रीमती उषा मोरे यांनी पालक विद्यार्थी व शिक्षक यांना मतदान करण्याविषयी शपथ दिली.
श्रीमती श्रेया हब्बू यांनी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सूचना दिल्या. इयत्ता आठवी वर्गाच्या वर्गशिक्षिका श्रीमती विल्मा मार्टिस यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची माहिती दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. इयत्ता नववीच्या वर्गशिक्षिका श्रीमती शोभा पंचांगमठ यांनी नववीच्या वर्गाच्या निकालाची माहिती दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नववीचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
