विज्ञान समितीतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अश्विनी शिंगे हिने केले तसेच विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या वेशभूषा केल्या व त्यांच्या विषयी माहिती सांगितली इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले.
सर्व विद्यार्थ्यांना माननीय मुख्याध्यापक श्री चंद्रकांत हारकुडे सर यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शिका डॉ शोभा जोशी यांनी विद्यार्थ्यांना कथेतून विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार कुमारी गौरव्वा मादर हिने मानले.
या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिक्षिका श्रीमती श्रेया हब्बू यांनी मार्गदर्शन केले.
