Tilgul Samarambha

Tilgul Samarambha

तिळगुळ समारंभ व हळदीकुंकू कार्यक्रम दरवर्षी पालकांकडून साजरा केला जातो . यावर्षी देखील हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम सर्व पालकांनी मिळून ठरविला.

 

कार्यक्रमाच्या दिवशी सर्व पालकांनी सरस्वतीची पूजा करून आलेल्या सर्व महिला पालकांना व शिक्षकांना हळदीकुंकू व तिळगुळ वडी दिली. सर्व विद्यार्थ्यांना तिळगुळ वडी देऊन समारंभ साजरा करण्यात आला. काही पालकांनी तिळगुळ समारंभ का साजरा केला जातो याविषयी माहिती सांगितली या सर्व कार्यक्रमांमध्ये पालक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. माननीय मुख्याध्यापक श्री चंद्रकांत हरकुडे यांनी पालकांना प्रबोधन केले.

Tags :