Marathi Day

Marathi Day

मराठी हिंदी विषय समितीने मराठी दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती अंजली कर्वे यांनी स्थान भूषविले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत हारकुडे, मार्गदर्शिका डॉ. शोभा जोशी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

 

कुमारी रक्षिता मसळी हिने मराठी दिनाचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुण्यांनी नाट्यवाचन कसे करावे याचे अनेक दृष्टांतातून विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. माननीय मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अंकिता शिंदे हिने केले.
आभार कुमार सुशांत रुपनर याने मानले.
या सर्व विद्यार्थ्यांना मराठी विषय शिक्षिका श्रीमती उषा मोरे यांनी मार्गदर्शन केले.

Tags :