कावेरी खेल महोत्सव अंतर्गतमशाल दौड घेण्यात आली. हा कार्यक्रम दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी साडेसात वाजता कावेरी इंटरनॅशनल स्कूल लोहगाव येथून सुरू झाला.
तेथून तो डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल बाणेर, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल कन्नड माध्यम केतकर रोड, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल गणेश नगर शाळेपर्यंत ही ज्योत घेऊन विद्यार्थी पळत होते.
गणेश नगर शाळेत संस्थेचे अध्यक्ष श्री कुशल हेगडे सर, सेक्रेटरी सौ. मालती कलमाडी संस्थेचे इतर पदाधिकारी संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मशाल पेटवण्यात आली व कावेरी खेल महोत्सवाची सुरुवात झाली असे जाहीर करण्यात आले.
