राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्री बसवराज उमराणी हे चालते बोलते संगणक आहेत. जन्मापासूनआंधळे असले तरी त्याच्याकडे विलक्षण स्मरणशक्ती आणि अफाट बुद्धिमत्ता आहे.
श्रीबसवराज उमराणी यांचा कार्यक्रम आज 14 सप्टेंबर 2023 रोजी आमच्या शाळेतीलविद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी श्री बसवराज सरांनी विद्यार्थ्यांनाव शिक्षकांना त्यांच्या जन्मतारखेवरून कोणता वार येतो हे सांगितले. नऊ संख्या असलेल्याबेरीज वजाबाकी पाच अंकांचा गुणाकार हे काही सेकंदात त्यांनी गणना करूनविद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर केले.
विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वासनिर्माण करून आपण काहीही साध्य करू शकतो हे सांगितले.
एकाग्रता वाढवण्यासाठीआपण काय केले पाहिजे चांगले जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टी आत्मसात केल्यापाहिजेत याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली.
शाळेतील विद्यार्थ्यांनीमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या या स्मरणशक्तीला आमचे कोटी कोटीनमन.
