Teachers Day

Teachers Day

चार सप्टेंबर 2023 रोजी डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल कन्नड माध्यम शाळेत शिक्षक दिन अतिशय उत्साहात आणि उत्कृष्टपणे साजरा करण्यात आला.

 

शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत हारकुडे यांना शाल व पुष्प देऊन विद्यार्थ्यांनी त्यांचा सन्मान केला तसेच मार्गदर्शिका डॉ. शोभा जोशी मॅडम व सर्व शिक्षक यांनापुष्पगुच्छ देऊन शिक्षकांचा सन्मान केला. माननीय मुख्याध्यापकांनी शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी यांना त्या दिवशीच्या शाळेची जबाबदारी सोपवली व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची रूपरेषा शिक्षकांद्वारे आखण्यात आली होती व कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.

 

शिक्षक दिनानिमित्त अनेक विद्यार्थी शिक्षक बनले होते व त्यांनी इतर वर्गांमधील विद्यार्थ्यांना शिकवले आणि उर्वरित विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले.

संस्थेकडून 5 सप्टेंबरला शिक्षकांसाठी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील सीनियर शिक्षक म्हणून बेस्ट अवॉर्ड श्रीमती शोभा पंचांगमठ यांना देण्यात आला व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये श्रीमती पूजा पुजारी यांना बेस्ट अवॉर्ड देण्यात आला.

Tags :