Farewell

Farewell

दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता दहावी वर्ग निरोप समारंभ साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री कुशल हेगडे, उपाध्यक्ष श्रीमती इंद्रा सालीन मॅडम, इंग्रजी माध्यम प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती कडकोळ, माननीय मुख्याध्यापक श्री चंद्रकांत हरकुडे, मार्गदर्शिका डॉक्टर शोभा जोशी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

 

दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माननीय मुख्याध्यापक श्री चंद्रकांत हरकुडे यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इयत्ता दहावी वर्ग शिक्षिका श्रीमती श्रेया हब्बू यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.

 

दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून एक छोटी नाटिका प्रस्तुत करण्यात आली तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून एक नृत्य प्रस्तुत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
श्रीमती उषा मोरे यांनी या कार्यक्रमांमध्ये यावर्षीच्या बेस्ट होस्ट जाहीर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विल्मा मार्टिस यांनी केले.
कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार प्रदर्शन श्रीमती शोभा पंचांगमठ यांनी केले.

Tags :