श्री फिरोज पूनावाला यांनी दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी शाळेला भेट दिली. त्यांचे स्वागत विद्यार्थिनींनी औक्षण करून केले.
विद्यार्थिनींनी शैक्षणिक कार्यक्रम व गीत यावेळी सादर केले.
श्री फिरोज पूनावाला यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी आपले शिक्षण पूर्ण करून समाजासाठी आपले योगदान द्यावे अशी इच्छा त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली.
एल पी एफ संस्थेकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
