दिनांक एक ऑक्टोबर 2023 गांधी जयंती निमित्त आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक तारीख एक तास श्रमदान या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत शाळेची स्वच्छता करून घेतली.
शाळेतील सर्व वर्ग तसेच शाळेच्या आजूबाजूच्या परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ करून घेतला.
मा. मुख्याध्यापक श्री चंद्रकांत हारकुडे सर यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देऊन या उपक्रमाची सांगता झाली.
