आज आमच्या शाळेत गणेश उत्सव निमित्ताने समूह गायन स्पर्धा पार पडली. या कार्यक्रमासाठी कन्नड संघ उपाध्यक्षा श्रीमती इंदीरा सालीयान मॅडम उपस्थित होत्या.तसेच निर्णायक म्हणून डॉ. राजश्री महाजनी व श्रीमती गीता भट यांनी काम पाहिले.
शाळेचेमुख्याध्यापक श्री चंद्रकांत हारकुडे , मार्गदर्शिका डॉ. शोभा जोशी, प्राथमिक विभाग इंग्रजीमाध्यम मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती कडकोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
समूह गायनासाठी राम व कृष्ण यांची भक्तीपरगीते घेण्यात आली होती. या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीतील चार हाऊस मधीलविद्यार्थ्यांचा सहभाग होता. एका समूहामध्ये दहा विद्यार्थी सहभागी होते. विजेत्यासमूहाला पुस्तक रूपात पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
संगीत शिक्षक श्रीउमाशंकर सर यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. या कार्यक्रमाचे प्रभारी म्हणूनश्रीमती उषा मोरे यांनी काम पाहिले तसेच सूत्रसंचालन कुमार सुशांत रुपनवरे यांने केले वआभार कुमार उमेश पवार यांने मानले.
