ही भाषण स्पर्धा इयत्ता आठवी नववी व दहावी वर्गासाठी आयोजित करण्यात आली होती.
आठवी वर्गासाठी विषय म्हणी व त्याचा अर्थ सांगणे होता. इयत्ता नववी वर्गासाठी प्रशंसनीय व्यक्तिमत्व हा विषय होता तर इयत्ता दहावी वर्गासाठी जीवन कौशल्य हा विषय होता या सर्व विषयांवर मुलांनी खूप छान तयारी करून भाषण उत्तम पद्धतीने सादर केले.
स्पर्धेचे निर्णयाक म्हणून श्री सदानंद तावरगेरी आणि श्रीमती प्रतिभा मुतालिकदेसाई यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या प्रभारी शिक्षिका म्हणून श्रीमती श्रेया हब्बू यांनी काम पाहिले.
