टिळक पुण्यतिथी निमित्त आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
इयत्ता आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. तिन्ही वर्गाला वेगवेगळे विषय दिलेले होते. या कार्यक्रमासाठी निर्णायक म्हणून श्रीमती वीणा देशपांडे आणि श्रीमती अक्षता शेट्टी यांनी काम पाहिले.
तिन्ही वर्गातील विजेत्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रभारी म्हणून श्रीमती शोभा पंचांगमठ यांनी काम पाहिले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
