सुदृढ आरोग्यासाठी जागृती निर्माण करण्यासाठी सन 2021-22.ह्या वर्षात
Suryanamaskar one month challenge …. हा उपक्रम शाळेत घेण्यात आला.Healthy India Bright India. या घोष वाक्या नुसार पालक, विद्यार्थी तसेच आजी आजोबा ह्यांनी देखील हया उपक्रमात सहभागी झाले होते.
दररोज सकाळी 7.30 ते 8 वाजेपर्यंत सूर्यनमस्कार करून घेतले जात. ह्यासाठी क्रीडा शिक्षक अनिल जाधव व स्वाती सातपुते यांनी मुलांना मार्गदर्शन केले. नंतर सूर्यनमस्काराची स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा वायक्तिक आणि सांघिक अशी घेण्यात आली. वयवर्ष 6 ते 80 वय चे स्पर्धक सहभागी झाले होते.ह्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कडकोळ ह्यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी काका मावशी ह्यांना ही सूर्यनमस्कार करण्यासाठी प्रेरित केले. ऐकूनच शाळेत अभ्यासाबरोबर सुदृढ आरोग्यासाठी जागरूकता निर्माण केली.