School Event

Ganeshotsav 2021

दिनांक 10 सप्टेंबर 2021 रोजी आपल्या शाळेत गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली.
कन्नड माध्यमाचे मुख्याध्यापक श्री. हरकुडे सर यांनी गणपतीची आरती केली. यावेळी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती कडकोळ मॅडम, पर्यवेक्षिका, काही शिक्षिका, मावशी व काका उपस्थित होते. कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर संपावे व शाळेची घंटा वाजून आमचे सर्व विद्यार्थी या इमारतीत यावेत. पुढच्या वर्षीचा प्रसाद सर्व विद्यार्थ्यांना वाटता येऊ दे, अशी प्रार्थना आम्ही या विघ्नहर्त्याकडे केली.
आशा करुयात की पुढच्या वर्षी आपल्या सर्वांना गणेशोत्सव अतिशय उत्साहात व आनंदाने, तणावमुक्त वातावरणात साजरा करता येईल.
धन्यवाद..

Archives

Categories

Back to Top