School Event

Swarvigyan

डॉ.केतकर रस्ता येथील डॉ.शामराव कलमाडी प्राथमिक शाळेत वाद्य व त्यामागचे विज्ञान संकल्पना उलगडून दाखवणारा ‘स्वरविज्ञान’ हा अभिनव उपक्रम यावेळी फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून 25 सप्टेंबर रोजी ऑनलाईन साजरा झाला.शालेय वयात एखादे वाद्य शिकण्याची गोडी लागावी या हेतूने हा उपक्रम साजरा होतो.संतूर,स्लाईड गिटार(चतुरंगी)तबला आणि तालवाद्ये या वाद्यांची यावेळी निवड करण्यात आली होती.त्याकरता सुरुवातीला अनुक्रमे दिलीप काळे,अमानो मनीष,मोहन पारसनीस, देवेंद्र तुळशीबागवाले या मान्यवर कलाकारांनी वाद्यांची वैशिष्ट्ये दाखवण्यासाठी स्वतंत्र रचना वादन केले.नंतर अनुक्रमे निशा तापडे,चित्रा हर्डीकर,निलोफर अन्सारी,सोनल खंडेलवाल या शिक्षिकांनी त्या त्या वादयामागील विज्ञान स्पष्ट करताना काही सोपी प्रात्यक्षिके करून,प्रतिरूपे(मॉडेल्स) दाखवून संकल्पना स्पष्ट केली.संगणकावरील स्लाइड्सच्या साहाय्याने वाद्ये व त्यांचे भाग,त्यावरील विज्ञान स्पष्ट करण्यासाठी ज्योती वखारे, सोनाली शिंदे यांनी परिश्रम घेतले.संगीत शिक्षिका डॉ.राजश्री महाजनी आणि माधुरी पुराणिक यांनी कलाकारांचा परिचय करून दिला आणि तालवाद्यानुकूल गीते गायली.शेवटी सर्व कलाकारांनी एकत्रितपणे ‘ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू’या गाण्याच्या आधाराने केलेले वाद्यवादन ही सुरेल मेजवानीच होती. नेहा जोशी,नीता भारती,स्वाती रानडे यांनी कलाकारांचे सत्कार केले.तांत्रिक साहाय्य प्रांजल तांबे यांनी केले.तर केदार कुलकर्णी यांनी चित्रीकरण बाजू सांभाळली.संगीता हांडे व प्रणिता घंटी या कलाशिक्षिकांनी केलेल्या आकर्षक चित्रांची पार्श्वभूमी वेधक होती.शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कडकोळ यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अनुजा केळकर यांनी केले.कार्यक्रमाच्या निमित्त कडकोळ मॅडमनी काही प्रात्यक्षिके दाखवली.शाळेच्या सचिव मालती कलमाडी यांनी मनोगत व्यक्त केले.विद्यार्थी,पालक तसेच नियामक मंडळ सदस्यांनी ऑनलाईन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Back to Top