Event

Plastic collection drive

पर्यावरण हा जीवनाचा मूळ आधार आहे.
पर्यावरणाचे संरक्षण ,संवर्धन हे मानवाचे कर्तव्य आहे .पण आपण आपले कर्तव्य योग्यरित्या पूर्ण करत आहोत का ?
हा प्रश्न सर्वांनी स्वत: ला विचारला पाहिजे . आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा ,थर्माकोलचा ढीग याचा पर्यावरणावर किती परिणाम होतो याचा कोणी विचार केला आहे का ?प्लास्टिकच्या थर्माकोलच्या अतिवापरामुळे जमीन,पाणी आणि पर्यावरण साखळी यांचे अतोनात नुकसान होत आहे .मानवाचा वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करणे गरजेचे आहे .याच उदात्त विचारांमुळे थं क्रिएटिव्हची स्थापना झाली आहे.

 

आपली शाळा डॉ.कलमाडी शामराव हायस्कूल ही या पर्यावरण सुरक्षेच्या मोहिमेत आपला खारीचा वाट उचलत आहे. या मोहिमेत प्रत्येक विद्यर्थ्याकडून त्यांच्या घरात वेगवेगळ्या (बिस्कीट,वेफर्स,इतर पदार्थांची पाकिटे ,प्लास्टिक बाटल्या )अश्या दररोजच्या वापरातील अनेक गोष्टींमधून निघणारे प्लास्टिक साठवले जाते व महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते शाळेत आणून दिले जाते. आपल्या शाळेतील हे एक महिन्याचे साठलेले प्लास्टिक थं क्रिएटिव्ह या संस्थेला दिले जाते .ही संस्था या प्लास्टिकने इंधन निर्मिती करते ज्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहते .

 

हा साधा सरळ उपक्रम आहे .आपल्या शाळेतील सर्वांनी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आत्ता पर्यंत प्रत्येक महिन्याला जवळ जवळ ९० किलो प्लास्टिक जमवले गेले आहे . हा आपला सतत चालणारा व स्तुस्त्य उपक्रम आहे

Archives

Categories